डॉ. किशोर सानप___सुधाकर पांडुरंग कदम : गझल गायकीचा वारकरी




सुधाकर कदम, १३ नोव्हेंबर १९४९ रोजी विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातल्या दोनोडा या खेडेगावी जन्मलेला एक उमदा गायक माणूस. बाप पांडुरंग. वारकर्‍याचं घराणं.खुद्द पांडुरंग बाप अनवट चालीत भजनं गात असे. गायनाचा पांडुरंगी गळा आणि वारकरी गायनाची परंपरा सुधाकरला बाळकडूच्या रूपातच मिळाली. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी गावी संगीत शिक्षकाची नोकरी केली. आर्णीसारख्या खेडेगावांतून महाराष्ट्राला आणि बृहन्महाराष्ट्रांतल्या रसिकराजांवर गझल गायकीची मोहिणी घालणारा सुधाकर म्हणजे गझलनवाझ, गझलगंधर्व, गझलचा स्वरताज. सुधाकर गझल गायकीसाठी, आपलं अख्खं आयुष्य साधना, तपश्चर्या करून; गझलांना स्वरसाज देताना, धुंदीत आणि गुंगीतच जगला. रमला. खरंतर सुधाकरचा अवतार सुफियाना गायकालाच शोभणारा. चेहर्‍यावर कारुण्यभाव.जगातलं दुह्नख नष्ट व्हावं ही चिंता. मानेवर वाढवलेल्या केसांच्या बटांची शाही झालर. गहुवर्णी देहयष्टी. जणू आपल्याच धुंदीत गाणारा फकिर. आपल्याच मस्तीत आणि धुंदीत जगला आणि रमलाही. खरंतर सुधाकर म्हणजे, गझल गायकीचा वारकरीच. अजूनही त्याचा रियाझ, गायकी आणि गायकीची वारी थांबलेली नाही. 

गायन हा सुधाकरचा श्र्वास आहे.प्राण आहे. आत्मा आहे.गझलेच्या देहातला श्र्वास-आत्मा गायनाच्या स्वरानं उजागर करण्याच्याच साधनेत रत असलेला हा कलावंत आहे.म्हणूनच कवी सुरेश भट, संगीतकार यशवंत देव, राम पंडित, पत्रकार अनंत दिक्षित, कवी श्रीकृष्ण राऊत आदिंसह सर्वदूर रसिकांनीही सुधाकर कदमच्या गझल गायकीला हृदयात अढळ स्थान दिलं आहे. आद्य गझल गायक आणि गझलनवाज म्हणून समाजानं त्याचा गौरवही केला आहे. 

सन्‌ १९७५ पासून तर आजतागायत सुधाकर कायम गझल गायकीचा रियाझ करीतच आहे. अशी गावी मराठी गझल  या गझल गायनाचे शेकडो धुंद करणारे कार्यक्रम सुधाकरनं आजवर केले आहेत. खुद्द सुरेश भटांनी सुधाकरच्या गझल गायन कार्यक्रमात गझलांचं निवेदन केलं आहे.सुरेश भटांनी गझलेला शब्द दिला. मराठीत गझल अजरामर केली. सुरेश भटांच्याही आधी माधवराव पटवर्धनांनी गज्जलांजली (१९३५)पहिल्यांदा मराठीत आणली.  पुढे मंगेश पाडगावकर आणि विंदा करंदीकरांसह अनेक दिग्गज कवींनीही गझलचा प्रभाव लक्षात घेवून गझल लेखनात उमेदवारी केली. परंतु मराठी रसिकांच्या हृदयावर साम्राज्य केले ते गझलसम्राट सुरेश भट आणि गझलराज कवी श्रीकृष्ण राऊत यांच्या हृदयस्पर्शी गझलांनीच. मराठी गझलला लोकप्रिय आणि रसिकमान्य करण्यात या दोन्ही कवींचं योगदान अनन्यसाधारण आहे. गझलेला दिलेल्या शब्दांना अस्सल स्वरांची गायकी दिली ती आद्य गझलगायक सुधाकर कदम यांनी. 

सुरेश भटांची गझल आणि सुधाकरची गायकी, असा दीर्घ प्रवास विसाव्या शतकाच्या शेवटच्या दोन दशकात झालेला आहे. विशेष म्हणजे गझलसम्राट विदर्भपुत्र सुरेश भटांनी गझलेला दिलेल्या शब्दांना स्वरांचा साज चढविण्याचे महत्कार्य  विदर्भपुत्र सुधाकर कदमांनीच सुरूवातीच्या काळात केले. सुरेश भटांच्या लोकप्रियतेला सुधाकरनं स्वरांची सलामी दिली. गझल गायकीत सुधाकरनं आपलं अनन्यसाधारण स्थानही कमावलं. मराठी गझल गायकीची सन्‌ १९७५ पासूनच सुरूवात करून मराठी गझल गायकीला भूमीही उपलब्ध करून दिली. पुढे विदर्भातील अकोल्याचे गझलनवाज भीमराव पांचाळेंनी गझल गायकीत सर्वदूर चार चांद लावले. याच पाऊलवाटेवर राजेश उमाळे, दिनेश अर्जुना, मदन काजळे, विजय गटलेवार, माधव भागवत, रफिक शेख  यांनीही गझल गायन क्षेत्रांत गायकी विकसित केली आहे. सुधाकरनं मराठी गझल गायकीची वहिवाट निर्माण केली, हे त्याचे योगदान मराठी गझल गायन क्षेत्रांत अलौकिक मानायला हरकत नाही.

खुद्द सुधाकर गझल गायनाबाबत म्हणतो, गझल हा काव्यप्रकार इतर गीत प्रकारांपेक्षा वेगळा असल्यामुळे त्यासाठी वेगळ्या सुरावटी तयार कराव्या लागतात.संगीत हे केवळ तंत्र नसून अंतर्मनातून स्फुरणारी ती एक शक्ती असून ईश्र्वरप्राप्तीचे साधन आहे. मात्र त्यासाठी तपश्चर्या करणे आवश्यक असते. कोणतीही कलासिद्धी अंतह्नकरणाला पिळवटून निष्काम साधन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा